…म्हणून मी विजयाचा जल्लोष करणार नाही- सत्यजित तांबे

मुंबई | नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. चांगलं आव्हान निर्माण केलं होतं.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला.

मोठा विजय होऊनही सत्यजित तांबे विजयाचा जल्लोष करणार नाहीत. भावनिक कारणामुळे ते विजयाचा जल्लोष करणार नाहीत. तसं त्यांनी ट्विट करून सांगितलं.

सत्यजित तांबे यांचे सहकारी आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं बुधवारी रात्री अपघाती निधन झालं. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मित्राचं निधन झाल्याने सत्यजित तांबे अत्यंत व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-