“लवासाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”
मुंबई | लवासा हिल स्टेशन प्रकरणात शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकणी शरद पवार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ज्यांनी लवासाबाबत सत्तेचा दुरुपयोग केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मी शांत बसणार नाही, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. दोन गावांचा निर्णय आला आहे. अजून 18 गावे बाकी आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्नही किरीट सोमय्यांनी विचारला आहे.
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन, शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेणे आणि बेकायदेशीरपणे त्या ताब्यात घेऊन सरकारच्या विविध विभागांकडून परवानग्या थेट मिळवून लवासा हिल स्टेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे, असे अनेक आरोप प्रकल्पाविषयी करण्यात आले आहे.
दरम्यान, लवासा प्रकल्पाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद आणि शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती यांची मोठी भागीदारी असल्यानेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या आदेशामुळे प्रशासकीय विभागांची मंजुरी मिळाल्याचा आरोप केला गेला आहे.
थोडक्यात बातम्या –
“उद्धव ठाकरे तात्काळ नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
“भारतीयांनी तात्काळ कीव सोडावं”; भारतीय दूतवासानं दिल्या महत्त्वाच्या सूचना
पोस्टाची भन्नाट योजना, खातं उघडा आणि दरमहा मिळवा ‘इतके’ रूपये
“सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर कारवाई करत नाही”
Comments are closed.