बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार

जळगाव | गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारणात भाजपातून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे विरूद्ध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी अनेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं. मुख्यमंत्रीपदाकरिता खांदेशावर कायमच अन्याय झाला आहे. मी टरबूज्या म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर आणून ठेवता.  ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये 40 वर्षे हमाली केली. शहरामध्ये भाजप संघापुरता मर्यादित होता. भारतीय जनता पार्टीला मोठं करण्याचा प्रयत्न केला, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

उभं आयुष्य नाथाभाऊने घातलं. मात्र, नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदापर्यंत आला पण नाथाभाऊचं नाव वगळलं गेलं की नाही?, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्रीपदाचा अधिकार या खांदेशचा होता. हा अन्याय नाही का? 70 वर्षे झालेत स्वातंत्र्याला सत्तर वर्षात कोकणात तीन मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी झाले, नारायण राणे झाले, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी बोलतांना मुख्यमंत्रीपदाबाबत मनातील खंत व्यक्त केली आहे. विदर्भातील चार मुख्यमंत्री झाले. पाचवा देवेंद्र झाला. मराठवाड्यातील चार झाले. विलासराव, अशोक राव चव्हाणांसहित, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासहित चार मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राचा अधिकार होता मुख्यमंत्रीपदाचा. मात्र, पक्ष मोठा करूनही मुख्यमंत्रीपदाची संधी डावलण्यात आली, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

Corona Update: कोरोना नियमांविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“तुमच्या कुंडल्या तुम्हालाच तुरूंगात बसून पाहाव्या लागणार, आमच्या हातात सुद्धा बरचं काही आहे”

घटस्फोटानंतर राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, म्हणाली…

“रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा”

जिओला सर्वात मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटी ग्राहकांनी सोडली साथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More