Top News पुणे महाराष्ट्र

“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”

पुणे | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांवर विरोधी नेते अनेकवेळा पुण्यातून निवडणुक लढवली म्हणून पाटलांवर निशाणा साधतात. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाटलांनी पुण्यातून विधानसभा निवडणुक लढवली असं म्हणत पाटलांना नेहमी हिणवलं जातं. मात्र पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नाही तर पक्षाने आदेश दिल्यामुळे आपण निवडणुक लढवली असल्याचं पाटील यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आता आपण पुण्याल जाणार हे बोलले त्यामुळे यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात”

शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी

फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण

देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या