महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ ट्विटची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन- अजित पवार

मुंबई | मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. ‘त्या’ ट्विटची आम्ही शहानिशा करून त्यामागचं कारण शोधू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं अजित पवार म्हणाले.

अधिकाराचा वापर कसा करायचा याचा निर्णय ज्याचा त्याने चिंतन करून घ्यायचा असतो. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विकासावर भर दिला आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करत असतो, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘डाव मांडते भीती’!

रतन टाटांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड; चौकशीत समोर आला धक्कादायक प्रकार!

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?- नारायण राणे

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या