मुंबई | #KanganaAwardWapasKar हा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू असून कंगणा राणावतला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. याला कंगणाने प्रत्युत्तर दिलं आहे.
माझा एकही आरोप चुकीचा ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे, असं कंगणा राणावतने म्हटलंय. कंगणाने #KanganaAwardWapasKar या ट्रेंडसह एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे.
ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही, असं कंगणाने म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
‘मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या’; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
गुप्तेश्वर पांडेंना मोठा धक्का; जेडीयूने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत पांडेंचं नाव कुठेच नाही
सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा