महाराष्ट्र मुंबई

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असं एकनाथ खडसे म्हणालेत. ते ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशारा  एकनाथ खडसेंनी दिला होता.

ईडीने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलवल्याचं कळतंय. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

थोडक्यात बातम्या-

“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”

वाढदिवसानिमित्त रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांकडून काव्यात्मक शुभेच्छा!

“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”

“भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात”

शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या