जळगाव महाराष्ट्र

…तर महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहून माफी मागेन, सांगेन मी नालायक, बदमाश आहे- एकनाथ खडसे

जळगाव | एमआयडीसी जमीन प्रकरणामुळे खडसेंवर राजीनामा देण्याची वेळ आली, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. यावर भाजप नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचं नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत?, असा सवाल खडसेंनी केलाय.

समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असं होतं का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

मी दोषी असेन तर उभ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहून माफी मागेन, सांगेन मी नालायक आहे, मी भ्रष्ट आहे, मी बदमाश आहे, असंही खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगणाशी लढायचं आहे- देवेंद्र फडणवीस

“…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही”

रिया आणि शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या