बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इथून पुढे मी माझा पगार समाजासाठी वापरेल- रोहित पवार

पुणे | कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्वीटरवरून तरूण तरूणींशी संवाद साधला. यावेळी तरूणांनी अनेक मुद्द्यांवर रोहित पवार यांना बोलतं केलं. तुमचं आवडतं गाणं कोणतं? इथपासून ते त्यांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नापर्यंत…! रोहित पवार यांनीही तरूणांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली. या ट्वीटर गप्पांमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक या सगळ्या गोष्टींवर रोहित यांना तरूणांनी बोलत केलं. असाच एक सामाजिक प्रश्न एका तरूणाने उपस्थित केला अन् रोहित पवार यांनीही अतिशय संवेदनशील आणि आदर्श उत्तर दिलं…!

आजी माजी आमदार यांच्या पगार आणि पेंशन या खर्चाबाबत एक तरूण आमदार म्हणून तुमची भूमिका काय असेल? हा पैसा शेतीसाठी व इतर विकास कामांसाठी उपयुक्त ठरू शकतो याबद्दल तुमची भूमिका? काय असा प्रश्न नरेंद्र पवार नावाच्या तरूणाने विचारला. यावर व्यक्तीशः माझा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल याची ग्वाही देतो, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

दुसरीकडे फक्त नोकरच नाही तर उद्योजक पण घडावेत यासाठी आपले काय प्रयत्न असतील? , असा प्रश्न एका तरूणाने विचारल्यावर शाळेपासून तर कॉलेज पर्यंत याबाबतीतील चर्चा करावी लागेल. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

स्वत:च्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचं माझं स्वप्न असल्याचं रोहित यांनी बोलून दाखवलं होतं. त्यांच्या या स्वप्नावर देखील एका तरूणाने त्यांना प्रश्न विचारला होता. यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेलं उत्तरं होतं. ते तुम्ही शब्दशः घेऊ नका. आपल्याला सर्वांसाठी मला काम करायचं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस

‘कर्जमुक्ती’ शेतकऱ्यांवर उपकार नाही तर त्यांचे आशीर्वाद- मुख्यमंत्री

महत्वाच्या बातम्या-

धर्मामुळे माणूस राक्षस नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो- मोहन भागवत

अण्णांचा मौन सोडण्यास नकार; सर्वाधिक दिवस मौनाचा विक्रम मोडला!

शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More