पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा रंगली आहे. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्विकारल्यापासून त्या पदाचा राजीनामा देणार याची चर्चा होती.
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मनसेतून काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीत आलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी एक वक्तव्य केलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगलं काम करेन. ज्या विश्वासानं मला पक्षात प्रवेश दिला तो विश्वास सार्थ ठरवेन, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.
रूपाली चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदावर असताना आपली कामगिरी चोख बजावली. एका व्यक्तीला दोन पदं असू नयेत म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असंही पाटील म्हणाल्या आहेत. परिणामी आता पाटील यांच्या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, रूपाली चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यभरात झंझावाती दौरे केल्याचं पाहायला मिळालं होतं. पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीत असणाऱ्या चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशानं रिक्त जागेवर रूपाली चाकणकरांची निवड झाली होती.
थोडक्यात बातम्या –
“होय, आम्ही नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते दररोज आमच्यावर मिसाईल्स सोडतायेत”
तरूणांसाठी गुड न्यूज; परिक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी
रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा!
रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत
Comments are closed.