बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

मुंबई | पॉर्नोग्राफी प्रकरणात उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यापासून अनेक बड्या अभिनेत्री समोर येत या प्रकरणावर भाष्य करत आहेत. अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्टने देखील याप्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. नुकतंच राज कुंद्रा एका नवीन अॅपसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा विचार करत असल्याचा दावा देखील गहनाने केला होता. यावर आता अभिनेत्री सई ताम्हणकरने स्पष्टीकरण दिलं आहे.

नुकताच गहना वशिष्टने एक दावा केला आहे. मला पॉर्न कंटेंटसाठी विचारण्यात आलं असल्याचं तिने म्हटलं आहे. मात्र, या दाव्यात काडीमात्र तथ्य नाही, असं सई ताम्हणकरने स्पष्ट केलं आहे,

दरम्यान, राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी मी त्याला भेटले होते. यावेळी त्याने मला त्याच्या एका नवीन अॅपबद्दल सांगितलं होतं. या अॅपचं नाव बॅलिफेम असं होतं. या अॅपवरील एका चित्रपटासाठी राज कुंद्राची मेहुणी शमिता शेट्टी आणि सई ताम्हणकरचा विचार केला जात असल्याचं गहनाने म्हटलं होतं

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर गहना वशिष्ट त्याच्या समर्थनार्थ समोर आली होती. तिने एक व्हिडीओ शेअर करत उगाच काही लोकांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं होतं. तसेच बोल्ड आणि एरोटिकामध्ये फरक आहे, असं देखील गहनाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती आली समोर

…अन् संपूर्ण गाव क्षणात गाडलं; आजोबांनी सांगितला काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव

आता अमेरिकेमध्ये आला नवा रोग, आजारही उपलब्ध नसल्याने चिंता वाढली!

“अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण”

“मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने मला शिविगाळ केली, मारायलाही धावले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More