बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IAF Helicopter Crash: अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू; आली महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | तामिळनाडूमधील कुन्नुर भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरला (IAF Helicopter Crash) अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्करातील सर्वोच्च पदावर असलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत (CDS Bipin Rawat) होते. त्यांच्या या अपघाताची माहिती मिळताच लष्करातील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. अशातच आता या घटनेविषयीची मोठी माहिती समोर आली आहे.

तामिळनाडूमध्ये झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू (13 of the 14 died) झाल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र, बिपीन रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Chief Marshal VR Chaudhary) सुलूरला रवाना झाले.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 13 जणांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती देखील आता मिळत आहे. भारतीय लष्करातील सीडीएस हे अतिमहत्त्वाचं पद असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे.

दरम्यान, बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे दोघेही या हेलिकॉप्टरमध्ये होते. भारतीय सौन्यदलाचं IAF Mi-17V5 हे अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर म्हणून ओळखण्यात येतं. मात्र, आता हेच हेलिकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने आता सुरक्षा यंत्रणेच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी पाहिलं की आग लागलेल्या अवस्थेत…”; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

Vasant More | अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More