बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

नवी दिल्ली | देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि देशाचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरला आज तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. या अपघातानं देशात एकच खळबळ माजली आहे. देशाच्या महत्त्वाच्या पदावर काम करणारे बिपीन रावत हे आपल्या कामानिमीत्त प्रवास करत होते. लष्कराच्या ताफ्यातील सुरक्षित अशा हेलिकाॅप्टरमधून प्रवास करत असताना हा अपघात घडला आहे.

देशाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी वापरण्यात येणार भारतीय सौन्यदलाचं  IAF Mi-17V5  हे अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर म्हणून ओळखण्यात येतं. रशियन बनावटीच्या या हेलिकाॅप्टरमध्ये दोन इंजिन असतात. तरीही अपघात घडल्यानं सर्वत्र या तर्क वितर्क उपस्थित करण्यात येत आहेत.

जगातिल सर्वाधिक अत्याधुनिक सुरक्षित हेलिकाॅप्टर म्हणून या हेलिकाॅप्टरला ओळखण्यात येतं. व्हिआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या ताफ्यात आणि बचाव कार्यासाठी या हेलिकाॅप्टरचा वापर करण्यात येतो. जास्तीतजास्त 13 हजार किलो वजन वाहण्याची क्षमता, तब्बल 36 सैनिकांना एकदाच घेऊन जाण्यास सक्षम असणारं हे अत्याधुनिक हेलिकाॅप्टर कोणत्या कारणानं कोसळलं हे अद्यापी स्पष्ट नाही झालं.

दरम्यान, भारत सरकारनं 2008 साली रशियासोबत या हेलिकाॅप्टरचा करार केला होता. तो करार 2013 मध्ये पुर्ण झाला आहे. सदरिल घटनेत दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकाॅप्टर हे कसल्याही वातावरणात आकाशात झेपावू शकतं. परिणामी देशाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला घेऊन जात असताना कोणत्या कारणानं हा अपघात घडला आसेल असं सर्वत्र बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

“एकीकडे RSS समान नागरी कायद्यासाठी आग्रही, तर भाजप…”

“आम्हाला वाटत होते की बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊतांचे गुरु, पण खरे गुरु शरद पवारच”

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षासाठी तडीपार

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश राज्य शासनानं थोर महापुरुषांच्या यादीत करावा”

omicron मुळे मृत्यूचा धोका किती?; दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More