#MeToo ची मला आता भिती वाटायला लागली- शिवसेना अामदार

औरंगाबाद | #MeToo मोहिमेमुळे जोखीम नको म्हणून महिलांना आता विविध क्षेत्रात नोकरीवर ठेवायला लोक धजावणार नाहीत, अशी भीती शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी व्यक्त केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

मला आता ‘मी टू’ची भिती वाटायला लागली अाहे. मला अजून त्याचा परिपूर्ण अर्थ देखील समजलेला नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आज नोकरीला असलेली महिला पुढे एक-दोन वर्षात आपल्या विरोधात खोटी तक्रार तर करणार नाही ना? या भितीने महिलांना नोकरीवर कायम ठेवण्याचे प्रमाण कमी होईल. महिला सक्षमीकरणाला धक्का बसेल ,”असे मत देखील संजय सिरसाट यांनी व्यक्त केले.

दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासल्या पाहिजेत- आदित्य ठाकरे

-धीर सोडू नका, पावसानं पाठ फिरवली असली तरी शासन तुमच्या सोबत आहे!

-विदर्भ दौऱ्यासाठी राज ठाकरे अमरावतीत दाखल; रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत

-एकनाथ खडसेंना मंत्रिपदाची तहान प्रदेशाध्यक्षपदावर भागवावी लागणार?

-महिला सशक्तीकरणावर बोलत होते संबित पात्रा; एम. जे. अकबरांचा विषय निघताच काढला पळ!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या