बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IANS-C Voter Survey| पंतप्रधान म्हणून आजही मोदींनाच पंसती, राहुल गांधी मात्र…

नवी दिल्ली | 2021च्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये सी-वोटरद्वारे एक विशेष सर्वेक्षण करण्यात आलं. ‘IANS-C Voter Survey’ नुसार पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींनाच (Narendra Modi) पसंती आहे.

गेल्या वर्षी निवडणुका झाल्या त्या सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींनाच पहिली पसंती आहेत. तर तामिळनाडू आणि केरळमध्ये मात्र लोकांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पसंती दर्शवली आहे. या दोन राज्यात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनाही मागे टाकलं आहे.

पंतप्रधानपदासाठी तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो?, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावेळी आसामधील 43 टक्के लोकांनी, केरळमधील 28 टक्के लोकांनी मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली आहे. तामिळनाडू व केरळमध्ये अनुक्रमे 29.56 टक्के व 49.69 टक्के लोकांची पहिली पसंती मोदीच आहेत. तर  पश्चिम बंगालमध्ये 42.37 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, या पाच राज्यांची व केंद्रशासित प्रदेशाची आकडेवारी एकत्र केली तर मोदींना 49.91 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. राहुल गांधी यांची 10.1 टक्के लोकांनी तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 7.62 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार म्हणून निवड केली आहे. या यादीत सर्वात शेवटी काँग्रेसच्या इतर नेत्यांना 5.46 टक्के व ममता बॅनर्जी यांचा 3.23 टक्के लोकांची पसंती आहे.

थोडक्यात बातम्या-

Corona Update| राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईतच, वाचा आकडेवारी

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…

“संजय राऊतांनी सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून ठेवलीय”

शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर, ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार

“भाजप देशातील नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More