नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांंची कन्या अंजली बिर्लाने आयएएसपदाला गवसणी घातली आहे.
विशेष म्हणजे अंजलीने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. ओम बिर्ला यांची अंजली ही धाकटी मुलगी आहे. अंजलीने मिळवलेल्या यशामुळे बिर्ला कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
अंजलीने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क असूनही आर्टमधून शिक्षण घेतलं. दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली होती. त्यानंतर अंजलीने दिल्लीतूनच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं.
दरम्यान, वडील देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत तरीही मुलीने आपल्या अथक प्रयत्नांनी यश खेचुन आणलं आहे. नाहीतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गरीब मुलं आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर परीक्षेत यश मिळवलेलं पाहिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी
टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार
‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं
तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!