Top News देश

5 अनाथ मुलांना मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी दिला मदतीचा हात

रांची |  आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 5 अनाथ मुलांना मायेचा मदतीचा हात देऊन त्यांना परत माणसात आणण्याचं काम केलंय मराठमोळे बार्शीचे सुपुत्र आणि रांची कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी…! कोडरमा शहरातील छोटगी बागी वार्डमधील गरीब कुटुंबातील अनाथ मुलांना डोक्यावर घोलप यांनी हात ठेवला आहे.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या 5 मुलांची भेट घेऊन तीन मुलांचा त्यांनी शाळेत दाखला घेतला. अगोदर वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. नंतर आईचंही निधन झाल्याने मुलांना भविष्याची मोठी चिंता लागली होती. मात्र माणुसकीबाज घोलप यांनी अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे.

माझी संवेदना आणि माझे आशीर्वाद या मुलांच्या सोबत आहेत. मुलांच्या भविष्यासंदर्भात सरकारच्या विविध योजनांतून त्यांना कश्या प्रकारे जास्तीत जास्त मदत होईल, अशा प्रकारचे प्रयत्न मी नक्कीच करेन कारण माझं बालपण देखील याच हाल-अपेष्टांतून गेलेलं आहे, अशी भावनिक तितकीच कणखर प्रतिक्रिया रमेश घोलप यांनी दिला आहे.

रमेश घोलप यांची झारखंड राज्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रात पेन्शनवाला साहेब म्हणून ओळख आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाने त्यांनी जनतेच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. 5 अनाथ मुलांना मायेचा हात दिल्यानंतर घोलप यांची सर्वच क्षेत्रातून वाहवा होत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

महत्वाच्या बातम्या-

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले!

रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याच्या तक्रारी, खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी

रायगडला ‘निसर्ग’चा मोठा फटका; पालकमंत्री आदिती तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे ही महत्त्वाची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या