Top News

दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया

Loading...

नवी दिल्ली |  नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यांवर सुरु असलेल्या हिंसाचारात इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या अधिकाऱ्याचा मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर नाल्यामध्ये सापडला होता. यावर मृत अधिकाऱ्याच्या आईने सून्न करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

तो नुकताच कामावरुन घरी आला होता. त्याच्यासाठी चहा ठेवला होता. तेव्हा शेजारी धावत घरी आले आणि बाहेर लोक हिंसा करत असल्याचे सांगितलं. तेव्हा तो बाहेर पडला. त्याने चहाही घेतला नाही. त्यानंतर तो परत आलाच नाही, अशी भावुक प्रतिक्रिया अधिकाऱ्याच्या आईने दिली आहे.

माझा मुलगा इतरांना वाचवण्यासाठी शेजाऱ्यांसोबत घराबाहेर पडला. त्यानंतर जमावाने त्याला खेचून नेले. माझ्या मुलाची जमावाने हत्या केली, असंही त्या म्हणाल्या आहेत.

माझ्या मुलाला जमावाने खेचून नेल्यानंतर मी लगेच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. रात्रभर मी त्याचा शोध घेतला, पण तो कुठे सापडला नाही, असं आई म्हणाल्या आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”

महत्वाच्या बातम्या-

‘नशीब ते जिवंत तरी आहेत’; न्यायमूर्तीच्या बदलीवरून रिचा चड्डाचा केंद्र सरकारला टोला

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे

आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या