बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांच्या ताब्यानंतरही अफगाणिस्तानचा संघ विश्वचषक खेळणार परंतु…; ICCने घातल्या ‘या’ जाचक अटी

नवी दिल्ली | अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाण लोकांवर अनेक निर्बंध घातले. मात्र, क्रिकेट खेळवण्यावर कोणतेही बंधन घालणार नसल्याचं तालिबान्यांनी स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक खेळणार की, नाही? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशातच आता अफगाणिस्तान संघ विश्वचषक खेळू शकणार आहे, मात्र तालिबान्यांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने काही अटी घातल्या आहेत.

अफगाणिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतल्याने काही धोका नाही आहे. मात्र, संकटग्रस्त देशात शासन बदलल्यानंतर काही गोष्टी कशा उलगडतात यावर नजर ठेवली जाईल. अफगाणिस्तान संघाने देशात सुरू असलेल्या गोंधळादरम्यान तालिबानच्या झेंड्याखाली खेळण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी त्याला सहभागी होण्यापासून रोखू शकते, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे कार्यवाहक सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी रविवारी स्पष्ट केलं.

अफगाणिस्तानचा संघ आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य आहे आणि संघ सध्या विश्वचषकाची तयारी करत आहे आणि तो संघ गट टप्प्यात खेळणार आहे. त्यांच्या सहभागाची प्रक्रिया सामान्यपणे सुरू आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेटमध्येही बदल करण्यात आले आहेत, असंही अलार्डिस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघाने आपापल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. तर विश्वचषकासाठी बक्षिसांची घोषणा देखील आयसीसीकडून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे काँग्रेस करणार राजभवनासमोर मूक आंदोलन

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून बक्षिसांची खैरात! विजेत्या संघाला तब्बल ‘इतकी’ रक्कम मिळणार!

भाजपचा ‘हा’ बडा नेता करणार मराठवाड्यासाठी 72 तास अन्नत्याग आंदोलन

“आवाज दाबण्याचं काम जर होत असेल तर..”; अशोक चव्हाणांचा मोदी सरकारला इशारा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More