नवी दिल्ली | भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांना फार धक्का बसला आहे. 2014 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तर 2020 मध्ये वनडे आणि टी-20 मधून त्याने निवृत्ती घेतली.
धोनीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. केवळ भारतच नाही तर इतर देशांमध्येही त्याचे अनेक चाहते आहे. यासाठी आयसीसीने धोनीच्या निवृ्त्ती निमित्त खास व्हिडीयो तयार केला आहे.
MS Dhoni: One name, a million memories! 💫
What’s your favourite memory of the former India skipper? pic.twitter.com/sszLHobegw
— ICC (@ICC) August 15, 2020
आयसीसीने तयार केलेल्या या व्हिडीयोमध्ये धोनीच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. इंग्लंडचा क्रिकेटर जॉस बटलर याने या व्हिडीयोमध्ये धोनी मैदानावर कसा शांत डोक्याने खेळतो तसंच कशी परिस्थिती हाताळतो याबद्दल सांगितलंय. त्याचप्रमाणे भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही तणावपूर्ण परिस्थितीमध्ये धोनीच्या खेळाच्या शैलीचं कौतुक केलं आहे. शिवाय भारताचा गोलंदाज जसप्रित बुमराह अफगाणिस्तानचा विकेट-कीपर मोहम्मद शहजाद, इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्स यांनीही धोनीविषयीचं आपलं मत मांडलं आहे.
शनिवारी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर धोनीपाठोपाठ त्याचा कट्टर मित्र सुरेश रैनाने देखील निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या निवृत्तीनंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयकडे केली ‘ही’ खास मागणी
धोनीने निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडूलकरचं ट्विट, म्हणाला….
‘पुढचा प्रवास तुझ्यासोबत करेन’, भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ सुरेश रैनानेही जाहीर केली निवृत्ती
“मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभं आहे”
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती