भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यापूर्वी ICC ची मोठी कारवाई!

ICC Penalises Pakistan Ahead of Champions Trophy 2025 Clash Against India

Champions Trophy 2025 | भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy) हाय-व्होल्टेज सामना 23 फेब्रुवारीला दुबईत (Dubai) होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असतानाच, पाकिस्तान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. (Champions Trophy 2025)

पाकिस्तानसमोरील आव्हान

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव पत्करावा लागल्याने, पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला पराभूत करणे आवश्यक आहे.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कराचीमध्ये (Karachi) झालेल्या सामन्यात षटकांची गती कमी (Slow Over Rate) राखल्यामुळे पाकिस्तान संघाला मॅच फीच्या 5 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

मैदानातील पंच रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) आणि शारफुद्दोला (Sharfuddoula), तिसरे पंच जोएल विल्सन (Joel Wilson) आणि चौथे पंच एलेक्स व्हार्फ (Alex Wharf) यांनी केलेल्या आरोपानुसार, सामनाधिकारी अँडी पाईकाफ्ट (Andy Pycroft) यांनी हा दंड ठोठावला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) चूक मान्य केली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या (ICC Code of Conduct) अनुच्छेद 2.22 नुसार, प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधून 5 टक्के रक्कम दंड म्हणून वजा केली जाईल.

पाकिस्तानसाठी सेमीफायनलची लढाई

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला ‘ग्रुप स्टेज’मधूनच बाहेर पडावे लागू शकते. भारत आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. जर भारताने पाकिस्तानला पराभूत केले, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना हरवल्यास भारत उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश करेल. भारत आणि न्यूझीलंडने प्रत्येकी दोन सामने जिंकल्यास दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. (Champions Trophy 2025)

Title : ICC Penalises Pakistan Ahead of Champions Trophy 2025 Clash Against India

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .