खेळ

कोरोनामुळे टी-20 विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची म्हणजेच आयसीसीची सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड कप होणार होता. या बैठकीत टी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेलाय. यंदाचा स्थगित झालेला वर्ल्ड कप 2022मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसीने काढलेल्या परिपत्रकानुसार, टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आला असून तो 2022 मध्ये खेळवण्यात येणार आहे. यावेळी वर्ल्डकपच्या आयोजकांनी नाव अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टी-20 वर्ल्ड कप  पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या तेराव्या सीजनचं आयोजन करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. तेराव्या सीजनच्या आयोजनाच्या बीसीसीआयने तयारी सुरु केली होती. आयसीसीने घोषणा केल्यानंतर लवकरच बीसीसीआय आयपीएलबद्दल अधिकृत घोषणा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

करण जोहरच्या बेडरूममध्ये आहे ‘या’ अभिनेत्याच्या बायकोचा फोटो!

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; पोलीस पाटलासह व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल

35 कोटींची ऑफर दिली म्हणणाऱ्या आमदाराविरूद्ध सचिन पायलट यांनी सोडलं मौन; म्हणाले…

‘…जर हा निर्णय झाला तर आंदोलन करु’; अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

बलात्कार प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आरोपीने बाहेर आल्यावर पीडितेसह तिच्या आईसोबत केलं धक्कादायक कृत्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.