ICC T-20 World Cup l क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी-20 वर्ल्डकपकडे लागल्या आहेत. येत्या 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. अलीकडेच भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जवळपास सर्वच संघांनी आपापल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्याने करणार आहे. तर आज आपण जाणून घेऊयात कोणत्या संघात, कोणते खेळाडू आहेत.
भारताचे सामने कधी होणार आहेत? :
भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. विश्वचषकात अ गट सर्वाधिक चर्चेत असेल यात मात्र काही शंका नाही. कारण त्यात केवळ यजमान संघ अमेरिकाच नाही, तर भारत आणि पाकिस्तानच्या रूपाने दोन कट्टर प्रतिस्पर्धी देखील आहेत.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. चार दिवसांनंतर 9 जून रोजी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार आहे. भारतीय संघ 12 जून रोजी यजमान अमेरिकेशी भिडणार आहे आणि गट टप्प्यातील भारताचा शेवटचा सामना 15 जून रोजी कॅनडाशी होणार आहे.
ICC T-20 World Cup l असा असणार T20 विश्वचषक भारतीय संघ :
रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग, खलील अहमद
चाहत्यांना वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचे मोफत प्रसारण थेट मोबाईलवर देखील पाहाता येणार आहे. प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरारक सामने मोफत येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. तसेच टी20 वर्ल्डकप सामना हा प्रेक्षकांना थेट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर देखील पाहता येणार आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण हे डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.
News Title – ICC T-20 World Cup 2024
महत्त्वाच्या बातम्या
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप
पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा फॉर्मुला ठरला!… तर यांची वर्णी लागणार
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रेल्वेने प्रवास करत असाल तर थांबा…अन्यथा