बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अधुरी एक कहानी; ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा जिंकला विश्वचषक

मेलबर्न | अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 85 धावांनी मात करत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.

पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 99 धावांवर ढेपाळला.

भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. मात्र सलामीची जोडी अयशस्वी ठरल्यानंतर भारताचे अंतराने गडी बाद होत गेले आणि पुर्ण संघ 99 धावांत गारद झाला.

प्रथम गोलंदाजी करताना भारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. आणि धावांचा भलामोठा डोंगर उभा केला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे पण…; जागतिक महिला दिनी अशोक चव्हाणांची कविता

“अरे जे बाळासाहेबांचे झाले नाही, ते काय पवारांचे होणार”

महत्वाच्या बातम्या-

फटाक्यामुळे मुळशीत लग्नसमारंभादरम्यान लागली भीषण आग

येस बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा; ट्विट करून दिली ‘ही’ माहिती

“सरकारला 100 दिवस झाले पण अजून माझ्या भावाला बंगला मिळाला नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More