Top News महाराष्ट्र मुंबई

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मुंबई  | आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी वयोमर्यादेचा एक नवीन नियम बनवला आहे. या नियमानुसार 15 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.

हा नियम वरिष्ठ पुरुष, महिला आणि 19 वर्षाखालील संघांनाही लागू होणार आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम बनवला असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. याआधी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वयोमर्यादेचा नियम नव्हता. परंतू या नविन नियमानुसार आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूचे वय 15 किंवा त्यापेक्षा कमी आहे की नाही हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आयसीसीने असेही म्हटले आहे की, अपवादात्मक परिस्थितीच एखाद्या संघाला वयाचे निकष न पाळणाऱ्या खेळाडूला खेळू देण्याची परवानगी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या-

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड लसीच्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या