बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर!

मुंबई | ICICI या खाजगी क्षेत्रातील बँकेने MCLR (Marginal Cost of Fund Based Lending Rate) मध्ये नवीन वाढ केली आहे. ICICI च्या अधिकृत संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितानुसार, कर्जाचे नवीन व्याजदर 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खांद्यावरील EMI चा बोजाही वाढणार आहे.

भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने देशभरातील सर्व बँका ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. (रेपो रेट वाढणे म्हणजे, बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होण्यास तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याजदरही कमी होतो.)

आता आरबीआयच्या माहितीनुसार, एका दिवसाचे व्याजदर 7.30 ते 7.50 टक्क्यांवर वाढले आहेत. एक महिन्याच्या कालावधीसाठी 7.30 वरुन 7.50, तीन महिन्याच्या कालावधीसाठी 7.35 वरुन 7.55 टक्के करण्यात आले आहेत. शिवाय सहा महिन्यांसाठी 7.50 टक्क्यांवरुन 7.70 टक्के झाले आहेत. त्याचवेळी 1 वर्षासाठीचे व्याजदर आता 7.55 वरुन 7.75 टक्के झाले आहेत.

भारतीय रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने देशभरातील सर्व बँकांनी कर्ज महाग केली आहेत. याशिवाय बँकांनी रिझर्व बँकवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठेवीेंवरील व्याजदरातही वाढ केली.

थोडक्यात बातम्या –

‘राज्यसभा निवडणुकीत मी पराभूत झालो असतो तर…’; राऊतांचं मोठं वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड

बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More