नवी दिल्ली | भारतात दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात भारतात या वटवाघळांमुळेच कोरोना विषाणू पसरला का असाही प्रश्न विचारला जात आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चचे प्रमुख पद्मश्री रमण गंगाखडेकर यांनी उत्तर दिलं आहे.
भारतात वटवाघळामुळे कोरोना आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये वटवाघळमुळे कोरोना आला नाही किंवा पसरलाही नाही. भारतातील दोन प्रकारच्या वटवाघळांवर संशोधन करण्यात आले. या दोन्ही वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. मात्र तो माणसमध्ये संसर्गित होणारा नाही, असं रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे.
माणसामध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण पॅनगोलियन नावाच्या प्राण्यापासून झाल्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीला वटवाघळमुळे कोरोना होणार नाही, असं रमण गंगाखेडकर यांनी सांगितलंय.
चीनमधून उद्या रॅपिड टेस्ट किट येणार आहेत. या किटच्या वापराचा सर्विलन्सही होणार आहे, अशी माहिती रमण गंगाखेडकर यांनी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
यंदा सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज
राजकारण करण्याची ही वेळ नाही, आम्ही सरकारसोबतच- गिरीश महाजन
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत; घरात दारु कशी बनवावी? गुगलवर ट्रेंड
…तर 130 कोटी भारतीयांना लॉकडाऊन व्हावं लागलं नसतं-डॉ. अभय बंग
मोदी सरकार नकारात्मक आहे; शाहिद आफ्रिदीचा निशाणा
Comments are closed.