बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“Omicron चा प्रसार चिंताजनक, नियम पाळले नाही तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागणार”

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतातही शिरकाव झाला आहे. देशातील काही राज्यात Omicron व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलायला सुरूवात केली आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो घातक नसल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ओमिक्रॉनचा जगभरात झालेला प्रसार चिंताजन असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) मत आहे. सध्या भारतात मास्कचा वापर, नियमांचं पालन या गोष्टी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचं निदर्शनास आलं आहे.

कोरोनाची साथ आणखी पसरू नये यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, असं मत आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. जिथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर आहे तिथे योग्य ते निर्बंध लागू करण्यात आले पाहिजेत, असा सल्लाही डॉ. भार्गव यांनी दिला आहे.

दरम्यान, ओनिक्रॉनमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीतून धडा घेत भारतीयांनी वेळीच दक्षता घ्यायची गरज आहे. नियमांचे कोटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल म्हटले आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडली तर निर्बंध कठोर होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More