तंत्रज्ञान

आयडिया-वोडाफोनचा ग्राहकांना मोठा दिलासा; आता मोफत बोला!

नवी दिल्ली | सर्वच दूरसंचार कंपन्यांनी टेरिफ प्लानचे दर वाढवलेले असताना आयडिया आणि व्होडाफोन युझर्ससाठी खुशखबर आहे. एअरटेलनंतर आता आयडिया आणि व्होडाफोननेही इतर कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलने एफयूपी मर्यादा हटवण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. नव्या टेरिफनंतर डेटा महाग होण्यासोबतच इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी मर्यादाही ठेवली होती. त्या निर्णयावर ग्राहक नाराज होते. त्यामुळे एअरटेलने निर्णय बदलला असल्याचं दिसून येतंय.

टेरिफ प्लान महाग झाल्यानंतर व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना 28 दिवसांच्या प्लानमध्ये इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी एक हजार मिनिट दिले जात होते. तर, 84 दिवसांच्या प्लानमध्ये 3 हजार मिनिट होते. अशात 28 दिवसांचा प्लान असणाऱ्या ग्राहकांनी दररोज 60 मिनिटे वापरली, तर त्यांचा प्लान 16 दिवसातच संपला असता. त्यामुळे ग्राहकांचा खर्च आणखी वाढला होता.

दरम्यान, व्होडाफोन-आयडियाने नव्या निर्णयाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ‘फ्रीचा अर्थ आता फ्री होतो. आमच्या ट्रुली अनलिमिटेड प्लानमध्ये आता कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा आनंद घ्या’, असं ट्वीट करुन माहिती देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या