Voter ID l केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) रविवारी हे स्पष्ट केले की, मतदार ओळखपत्रांवरील (Voter ID Card) सारखा अनुक्रमांक असणे म्हणजे बनावट मतदान झाले आहे, असा होत नाही. दोन वेगवेगळ्या राज्यांतील मतदारांचे ओळख क्रमांक एकसारखे असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. नवी दिल्ली (New Delhi) येथे आयोगाने याबाबत माहिती दिली.
‘ईआयओएनटीआय’ प्रणाली :
निवडणूक आयोगाने सांगितले की, काही मतदारांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र (ईपीआयसी) क्रमांक एकसारखे असू शकतात, परंतु त्यांचा विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र क्रमांक वेगवेगळे असतात. त्यामुळे एकाच क्रमांकाच्या आधारे बनावट मतदान करणे शक्य नसते.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ‘ईआयओएनटीआय’ प्रणाली बनावट नोंदी काढून टाकण्यास आणि एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यास मदत करते. यामुळे निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडता येते.
Voter ID l विविध राज्यांतील मतदारांसाठी स्पष्टीकरण :
आयोगाने पुढे स्पष्ट केले की, जरी ईपीआयसी क्रमांक एकसारखा असला, तरी मतदाराला केवळ त्याच्या राज्यातील, त्याच्यासाठी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावरच मतदान करता येते. त्यामुळे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच क्रमांकाचे मतदार ओळखपत्र असले तरी, त्याचा गैरवापर करून बोगस मतदान करता येत नाही.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जरी दोन राज्यांमध्ये एकाच मतदाराचे नाव असले आणि समजा, फ़ोटो आणि इतर माहिती मध्ये साम्य आढळले, तरी तांत्रिक दृष्ट्या ते शक्य नाही. कारण, मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई, आणि इतर पडताळणी प्रक्रिया असते.