चंद्रपूर महाराष्ट्र

“70 टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य”

चंद्रपूर | काँग्रेसला लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी 70 टक्के उमेदवारी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या नवीन चेहऱ्यांना आणि 30 टक्के पक्षातील निष्ठावानांना देण्याचं धोरण स्वीकारावं लागेल, अशी भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेतील एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी मांडली आहे. ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

गावागावात, प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचा मतदारवर्ग आहे. या जोडीला निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला म्हणजे स्वबळावर किमान 40 हजार मते घेऊ शकणारा उमेदवार दिल्यास काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत विजय  निश्चित आहे, असं सुरेश धानोरकर यांनी म्हटलंय.

काँग्रेसला उमेदवारी देण्याच्या पारंपरिक धोरणात बदल करावा लागेल. भाजपला हरवायचे असेल तर त्यांच्याच व्यूहरचनेत त्यांना अडकवण्याची रणनीती आखावी लागेल.  निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी आणि  आपल्या पारंपरिक मतांचे विभाजन रोखावं लागेल, असंही सुरेश धानोरकर म्हटलंय.

भाजपला कोणत्याही पक्षातून आलेला उमेदवार चालतो. ते केवळ जिंकून येण्याची क्षमता बघतात. काँग्रेसमध्ये असे क्वचित घडते. येथे बाहेरून येणाऱ्यांपेक्षा वर्षांनुवर्षे पक्षात असलेल्यांना संधी दिली जाते. त्यामुळे सात-सात, आठ-आठ वेळा एकच उमेदवार दिसतो. नवीन चेहऱ्याला संधी मिळत नाही. निवडून येण्याची शाश्वती नसली तरी त्याच नेत्याला उमेदवारी. आता लाट येण्याचे दिवस संपले आहेत. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले नवीन चेहरे 70 टक्के आणि निष्ठावानांमधून 30 टक्के उमेदवार हे धोरण स्वीकारावे लागेल, असं सुरेश धानोरकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत यांना बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“….तोपर्यंत सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार”

सुशांत-अंकिता का वेगळे झाले? याचीही चौकशी झाली पाहिजे- संजय राऊत

आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट; आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

8 दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक स्थापन करणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या