बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

लखनऊ | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. उत्तर प्रदेशातही सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. सरकार तर्फे नियमांचं कडेकोट पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता नवा निर्णय घेतला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार उत्तरप्रदेशात कोरोनाचा रुग्ण ज्या ठिकाणी आढळेल त्या परिसरातील आजूबाजूची 20 घरं सील केली जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या उत्तर प्रदेशात वाढतच जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशात इमारतींसाठी ही वेगळे नियम तयार केले गेले आहेत त्यामध्ये जर एखाद्या मजल्यावर कोरोनारुग्ण आढळून आला तर संबंधित मजला सील करण्यात येणार आहे तसेच एका ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास त्या सबंध इमारतीला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येऊन 14 दिवसांसाठी तिथे निर्बंध लावुन कोणालाही घराबाहेर जाता येणार नाही. तसेच परिसरात एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास जवळपासचे सील करून त्यांना कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात सध्या 19 हजार 738 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी रुग्ण संख्येबाबत रविवारी ही माहिती दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशात आतापर्यंत 3 कोटी 54 लाख 13 हजार 966 कोरोना चाचण्या झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

थोडक्यात बातम्या

AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला

‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई

चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; काल दिवसभरात आढळले इतके रूग्ण

कामगाराला कोरोना झाल्यास…; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारचा ‘हा’ नवा नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More