बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपितं उघड होतील अन्…”

मुंबई | सध्या देशभरात मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण चांगलंच तापलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळातही खलबतं पहायला मिळत आहे. यातच विशेषतः राष्ट्रवादी प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर याप्रकरणी आक्रमक पवित्राच घेतलेला पहायला मिळतोय. अशातच त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर नवाबांची आरोप मालिका संपत नव्हती तोच त्यांनी आज पत्रकार परिषद घेत अजून खळबळ माजवली. आता नवाब मलिकांनी वानखेडेंचा एक दाढीवाला मित्रही त्या क्रुझवर असल्याचा दावा केला आहे. त्या दाढीवाल्या मित्राचं नाव काशिफ खान असल्याचंही मलिकांनी उघड केलं.

जो वानकेडे कालपर्यंत मराठी असल्याचं सांगत फिरत होता आणि मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होता आता त्याचाच पोलिसांवरचा विश्वास उडाला? तो मराठी आहे असं लिहिलं आहे, नवाब मलिक मराठी नाही का? पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपिते उघड होतील आणि भाजपचीही नाव समोर येती, असंही नवाबं मलिक यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडेंकडून राज्याला बदनाम करण्याचं काम चालू आहे. या सगळ्या कामात वानखेडेंना भाजप मदत करत असल्याचंही मलिकांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. त्यामुळे वानखेडेला अटक करुन जेलबंद करा. बरोबर हिवाळी अधिवेशनाच्या पहिले मोठी नावं समोर येतील, असा इशाराही मलिकांनी दिला.

थोडक्यात बातम्या – 

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

आता कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ कॅप्सुलनं होणार उपचार

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More