बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

सातारा | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकार मधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांविरोधात आपल्याकडे पुरावे असून हे सर्व पुरावे आपण ईडीकडे देणार असल्याचं सोमय्या बोलत आहेत. सोमय्यांनी राज्य सरकार मधील नेत्यांना धारेवर धरलं असल्यानं सोमय्या आणि राज्य सरकार मधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चालूच आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील या मुद्यावरुन किरीट सोमय्या यांच्यावर निषाणा साधला आहे. कटापूर येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. किरीट सोमय्या यांचा तोतरेपणा केव्हाच बाहेर काढला असता, असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, जरंडेश्वर कारखान्यावर सोमय्यांसोबत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. नाहीतर यांचा तोतरेपणा केव्हाच बाहेर काढला असता. मी पुढील परीणामांचा अजिबात विचार करत नाही.

ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला मी घाबरत नाही. भाजपच्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं म्हणत शिंदे यांनी यावेळी थेट ईडीला देखील आव्हान दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More