बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर ते 4 दिवसांत राज्य विकतील”

मुंबई | राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगताना पहायला मिळतो. अशातच गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना पुन्हा निशाण्यावर घेत खोचक टीका केली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर 4 दिवसांत राज्य विकतील, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील काही दिवसांपासून गैरहजर होते. त्यामुळे अजित पवारांकडे किंवा आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती. त्यावरून पडळकरांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांना जर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, अशी खोचक टीका पडळकरांनी केली आहे. त्याचबरोबर पडळकरांनी परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यावरून देखील ठाकरे सरकारचे कान टोचले आहेत.

दरम्यान, राज्यातील सर्व विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणहून लाखांचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहचलं. त्यामुळे हे सर्व प्रकरण सरकारच्या आशीर्वादाने चाललंय, असंही पडळकर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्या”

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More