बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है’; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

नवी दिल्ली | पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर सिद्धूच्या समर्थनासाठी अनेक नेत्यांनी देखील राजीनामा दिला आहे. सिद्धू हे तत्वनिष्ठ व्यक्ती आहेत. ते पंजाब आणि पंजाबच्या नागरिकांसाठी लढत आहेत, असं मत मंत्रिपदाचा राजीमाना दिलेल्या रझिया सुल्ताना यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे सिद्धूंची पुढची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सिद्धू यांनी शेर ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धूंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी, उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है, असा शेर म्हणत सूचक इशारा दिला आहे.

माझी लढाई मुद्यांवर विचारांवर आहे, मी हक्काची लढाई लढतोय, त्यात मी तडजोड करणार नसल्याचं नवज्योत सिंग सिद्धूंनी म्हटलं आहे. मी हायकमांडची फसवणूक करत नाही, ज्यांनी सुरक्षा घेतली, ते सुरक्षा रक्षक होऊ शकत नाहीत. मला पंजाबची प्रगती हवी. त्यात मी तडजोड करणार नाही, असंही नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला सिस्टिममधील गडबड मान्य नाही, सिस्टिममध्ये गडबड करणारेच राज्याचे रक्षक कसे होऊ शकतात?, असा सवाल करत मी सत्यासाठी लढत राहणार हेच माझं वचन आहे, असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More