“अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईल”
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेगॅससच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ पहायला मिळतोय. विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प पडलंय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसचे खासदार देवेक ओब्रायन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट आव्हान दिलं आहे.
विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. कृषी कायदे, रोजगार-महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षाच्या (पेगॅसस) या तीन मुदद्यावर आम्हाला चर्चा हवी आहे. यात सर्वात आधी राष्ट्रीय सुरक्षाच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा करावी, अशी मागणी खासदार देवेक ओब्रायन यांनी केली आहे.
मी केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत बघितलं नाही. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. मग गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यायला नको का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. बुधवारी अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं. तर मी टक्कल करेल आणि तुमच्या कार्यक्रमात येईल, असं थेट आव्हान त्यांनी गृहमंत्र्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, मी आता हरवलेल्या व्यक्तींची नोटीस काढणार आहे. त्यात गृहमंत्री देखील असतील. हे मी नक्कीच करेल. एक जबाबदार नागरिक म्हणून ही माझी जबाबदारी आहे, असंही देवेक ओब्रायन यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकीवेळी देखील ओब्रायन यांनी अमित शहांवर आक्रमक टीका केली होती.
थोडक्यात बातम्या-
‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”
पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
Comments are closed.