बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आणि आरएसएसला घाबरणाऱ्यांची आम्हाला गरज नाही, त्यांनी काँग्रेस सोडून जावं- राहुल गांधी

नवी दिल्ली | गेल्या 7 वर्षापासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2014 पासून काँग्रेसने अनेक राज्ये गमावली आहेत. 2019 च्या निवडणूकीआधी पक्षाने पुन्हा भरारी घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. आता येत्या उत्तरप्रदेशच्या निवडणूकीआधी काँग्रेस जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या सोशल मीडिया युनिटसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधींनी सडेतोड भूमिका मांडली आहे.

काँग्रेसला धाडसी कार्यकर्ते हवे आहेत. पक्षात राहून जर कुणी भाजप आणि आरएसएसला घाबरत असेल तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. अशा लोकांची आम्हाला अजिबात गरज नाही. जे घाबरले, ते आरएसएसचे झाले. आरएसएसवर निष्ठा वाहणाऱ्यांनी खुशाल तिकडं जावं, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

देशात असे खूप लोक आहेत, जे धाडसी आहेत, परंतु काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात घेतले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना आता भाजपच्या फेक न्यूजमुळं घाबरण्याची गरज नाही. ज्यावेळी पंतप्रधान सांगतात की योगी सरकारनं उत्तर प्रदेशमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलं काम केलंय, त्यावेळी लोक हसतात. भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजवर विश्वास ठेवणं आता लोकांनी सोडून दिलंय, असंही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, सध्या पंजाब काँग्रेस आणि राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात पुन्हा टीका-प्रतिटीका सुरू झाल्यानं वाद पेटला आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशच्या निवडणूकांवर देखील काँग्रेसचं लक्ष असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘रात्री कुणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही’; अजित पवारांचा मोठा खुलासा

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार- सुभाष देशमुख

…त्यामुळे शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नका- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More