बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजप एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही…’; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात एकूण 7 नव्या मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये काॅंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितीन प्रसाद यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही एखादी चांगली जागा नक्कीच मिळू शकते. आपला लढा हा पद-प्रतिष्ठेसाठी नसून निषादांच्या भल्यासाठी आणि कायद्यांसाठी आहे. संसद हे एक उच्च सदन आहे. जिथे कायदे बनवले जातात. जर भाजपने मला तिथे पाठवले तर मी तिथे जाऊन निषादांच्या हिताचे कायदे बनवेन, असंही निषाद यांनी सांगितलं.

योगीच्या नवीन मंत्रिमंडळात जितीन प्रसाद, पलटू राम, धर्मवीर प्रजापती, छत्रसाल गंगवार, संगीता बलवंत, संजीवकुमार गोंड आणि दिनेश खटिक यांना सामील करून घेतलं आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ मधील अनेक नेत्यांच्या मंत्र्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. त्यातच आता संजय निषाद यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, पुढील वर्षी विधानसभासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये कोणता पक्ष वचर्स्व राखणार आहे. ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…त्यांनी जरा डोळे उघडून पहावं, हे आंधळ्या आणि बहिऱ्याचं सरकार”

अबब! भारतीय खेळाडूचा अमेरिकेत धमका, अवघ्या 22 चेंडूत कुटल्या 102 धावा; पाहा व्हिडीओ

‘टिंब टिंब टिंबचा अर्थ काय होतो? आता काय समजायचं माणसानं’; अजित पवारांची टोलेबाजी

अफगाणिस्तानात आता पुरूषांचेही हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींचा बंगले घेण्यासाठी वापर केला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More