Top News महाराष्ट्र मुंबई

‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”

मुंबई | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उद्य सामंत यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणाला साधला आहे.

भाजपनं याआधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असं उद्य सामंत यांनी म्हटलं आहे.

सुधीरभाऊ हे विधीमंडळातील जेष्ठ नेते असल्याचंही सामंत म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते

दरम्यान, शरजील उस्मानीनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच आघाडी सरकारने त्या वक्तव्याविरोधात आक्षेप नोंदवला असून कुणीही त्याचं राजकारण करु नये, असं आवाहनही सामंतांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

“…तर मग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पालिकेच्या शाळा आता ‘या’ नावाने ओळखल्या जाणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या