पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे- संजय राऊत

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत ‘साम मराठी’ या वृत्त वाहिनीसोबत बोलत होते.

शिवसेनेची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी झाली असून उद्धव ठाकरेंनी त्याबाबत निर्णय घेतल्यास आम्ही स्वबळावर लढू, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, अकाली दल आणि इतर मित्रपक्षांची भूमिका महत्वाची असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपची युतीबाबत आता असणारी सकारत्मकता 2014 मध्ये दिसली असती तर देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

Google+ Linkedin