देश

2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!

तिरुअंनतपूरम | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप निवडून आला तर भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे. ते तिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

भाजप पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकले तर, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था संपेल. त्यांच्याकडून घटना उद्ध्वस्त केली जाईल. त्यांची नवी घटना हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर आधारित असेल, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?

-नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!

-ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचं महत्व काय कळणार!

-भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण

-संभाजी भिडेंना संरक्षण कुणाचं आहे?; धनंजय मुंडेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या