बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“युपी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…”

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक प्रमुख म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेत ढोल वाजवित मंचावर प्रवेश केला.

जितेंद्र आव्हाड यांनी कोणीही ओबीसींना गृहीत धरता कामा नये त्यासाठी एक व्हा, असं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, बिहारमधील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो मग महाराष्ट्रातील ओबीसी मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आपण जर एक झालो नाही, आपली ताकद राजकारण्यांना कळाली नाही तर ते आपल्याला गृहीत धरतील. जातीचा अभिमान केव्हा येतो ज्यावेळी आपल्याला जात समजते तेव्हा दुर्देवाने ओबीसींना सर्व हातात मिळालं, त्यामुळे त्यांना जातचं समजली नाही. 354 जाती आहेत. त्यापैकी आरक्षणाचा लाभ केवळ 16 ते 17 जातींना मिळाला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, बाकी आजही सर्व जाती दऱ्या खोऱ्यात आणि पाल्यावस्त्यात राहतात. त्यांना बाहेर काढून त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याची गरज आहे. ती गरज भागविण्यासाठीचं मी तुम्हाला एकत्र केलं आहे. त्यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसींच्या जनगणनेवरूनही जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत. या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्र्याची गणना होते पण, माणसातील वाघांची म्हणजेच ओबीसींची जातगणना केली जात नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

“अति बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले, हिंमत असेल तर…”

पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

“मोठ्यांनीही चूक केली तर लहानेही काय करू शकतात हे दाखवून दिले”

“चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे”

“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More