बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चिक्कीचा ब्रँड माझ्या नावाने वाढत असेल तर…’; चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

मंबई | फडणवीस सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्या सेना-भाजप सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांना क्लीन चीट दिली होती. अशातच पुन्हा एकदा चिक्की घोटाळा चर्चेत आला आहे. चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना कुठेही पैसा आणि कुठेही भ्रष्टाचार दिसतो म्हणून ते आरोप करणारच. मी माझा निर्णय मोकळ्या मनाने घेतला आहे आणि ते मी स्पष्ट शब्दातसुद्धा सांगितलं आहे. जर चिक्कीचा ब्रँड माझ्या नावाने वाढत असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही. ते खाऊन लोकांचं आयर्न वाढत असेल तर मला हरकत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत. यामध्ये शिक्षक भरती, मुख्यंंमत्री ग्रामसडक योजनेत मी अत्यंत चांगली कामं केली होती. ती तुम्ही प्रत्यक्षात पाहिली आहेत तसेच अशा पद्धतीचे मी अनेक निर्णय घेतले आहेत. हा निर्णयही तितकाच जबाबदारीनं घेतला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्यासारखा विचार माझ्या डोक्यात येणारच नाही, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान, पंकजा मुंडे मंत्री असताना महिला आणि बालकल्याण विभागाने त्यावेळी एका दिवसात 24 आदेश काढले होते. यामध्ये चिक्की, चटई, डिश आणि इतर वस्तुंच्या खरेदीसाठी 206 कोटी खर्च केले होते. मात्र खरेदीमध्ये नियमभंग झाल्याचा आरोप झाला होता. यामध्येच अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की ही निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

थोडक्यात बातम्या-

पावसाची बातमी! पुण्यासह सातारा जिल्हात पावसाचं पुनरागमन

मोठी बातमी! 14 ऑगस्ट ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

“बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष”

अनिल कपूरच्या घरी लगीनघाई; मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More