बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल- चंद्रकांत पाटील

पुणे | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाने सगळीकडे थैमान घातलं आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतू, आता कुठे ही परिस्थिती सुधारत असून, कोरोना रूग्णांच्या संख्येतही घट होत आहे. असं असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे देशात 40 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 21 रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात सापडले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं तोंड द्यायचं याविषयी सांगितलं आहे.

यापूर्वी कोरोना संकटकाळात अनेक डॉक्टर्स, नर्सने आपल्या रूग्णालयाच्या माध्यमातून कर्तव्य बजावलं आहे. मात्र, आता नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने एस रूग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

तसेच तिसरी लाट येऊच नये, यासाठी आपण प्रार्थना करूयात. मात्र तिसऱ्या लाटेसाठी आपण सज्ज राहणेही तितकंच महत्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा’; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More