एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर जाहीर फाशी द्या- अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली | दिल्ली अबकारी धोरणप्रकरणी सीबीआयने दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची (Arvind Kejriwal) चौकशी केली होती. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आधीपासूनच कारागृहात आहेत. यावर बोलताना केजरींवालींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आव्हान दिलं आहे.
आपल्याला माझ्या विरोधात एका पैशाचा जरी भ्रष्टाचार सापडला, तर मला जाहीर फाशी द्या. पण हा रोजचा तमाशा बंद करा, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
एवढंच नाही, तर केंद्र सरकारने आपल्या मागे, आपण चोर आहोत हे सिद्ध करण्यासाठी तपास संस्था लावल्या आहेत, असंही जरीवाल यांनी म्हटलं आहे.
सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स आणि पोलिसांना माझ्या मागे लावले आहे. का? तर कुठल्याही प्रकारे हे सिद्ध करायचं आहे की, केजरीवाल चोर आहे. हे सिद्ध करायचं आहे की, तो भ्रष्टाचारात सामील आहे, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
- ‘शिंदे सरकार कोसळेल’; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
- पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
- ‘… तर महाराष्ट्र पेटवू’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
- “कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”
- मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Comments are closed.