Top News महाराष्ट्र मुंबई

‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा

मुंबई | दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात आहे, असं वादग्रस्त वक्तव्य दानवेंनी केलं होतं. या वक्तव्यानंतर दानवेंवर खूप टीका झाली. दानवेंनी माफी मागावी अशी मागणी होत होती मात्र त्यांनी माफी मागितली नाही तर आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.

शेतकऱ्यांची माफी मागणार का, असा सवाल दानवेंना विचारला असता, त्यावर ‘मी हाडाचा शेतकरी आहे, असं उत्तर दानवेंनी दिलं आहे. दानवेंच्या याच वक्तव्यावरुन पत्रकारानी बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे.

दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागीतली नाही, तर लोकं बोलणं सोडून मारणं सुरु करतील. मी शेतकरी नंतर आहे. माझा धर्म हिंदू, मुस्लिम किंवा मी कोणत्याही पार्टीचा असलो. तरी माझा बाप शेतकरी आहे.  दानवेचा बाप ही शेतकरीच होता. त्यामुळे हे दानवेंनी विसरले नाही पाहिजे, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दानवेंनी माफी न मागितल्यास त्यांना त्यांच्या घरात घुसून मारु, अशी प्रतिक्रिया कडूंनी दिली होती. यावर विचारल्यास ‘त्याला योग्य वेळ यावी लागेल ना’, असं उत्तर बच्चू कडू यांनी दिलं.

थोडक्यात बातम्या-

‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान

…म्हणून जनतेने मोदी सरकारला बहुमत दिलं आहे- कृषिमंत्री नरेंद्र सिंह

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”

“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या