मुंबई | शिवसेनेची बीकेसी मैदानामध्ये विराट सभा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच राजकीय सभा आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टिका केली आहे. लोकांच्या हातात भोंगे आणि हनुमान चालीसा देत मजा पाहत बसतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.
कारसेवकांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. कारसेवा म्हणजे गाड्या धुवायच्या असतात का?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तुमचे विकृत हिंदूत्व आम्हाला माहिती नाही. संजय राऊत म्हणाले देशाला दिशा दाखवा. काय दिशा दाखवायची?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
आम्ही जरी काँग्रेससोबत गेलो आहोत तरी आम्ही हिंदूत्व सोडलेलं नाही. विधानसभेत देखील मी बोललो होतो. दाऊद जर बोलला मी भाजपत येतो, तर मंत्री म्हणून कधीही दिसू शकतो, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. ते सांगत राहतील दाऊद कसा गुणाचा पुतळा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
‘शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
“उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही”
केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे संतापले, म्हणाले…
रूपाली ठोंबरे आक्रमक, केतकी चितळेला दिला गंभीर इशारा
‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले
Comments are closed.