पुणे | राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र पालटलं. शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मर्सिडिज कार देण्याची ऑफर दिली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि 116 दुचाकी अशाप्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या बक्षिसांमुळे ही स्पर्धा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली.
नितेश राणे यांनी ट्विट करत खास ऑफर दिली आहे. ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील त्यावर्षी आमदार महेश दादा लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला म्हणजेच फायनल सम्राटाला मर्सिडिज गाडी बक्षिस म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा नितेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिल्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी टोकण नोंदणी केली होती. बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहताना शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होता आलं, याचा मनस्वी आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस
“भ्रष्टाचार नष्ट करण्याचं काम आमच्या सरकारने केलंय”
राज्यसभेवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य; ‘या’ काँग्रेस नेत्याने दिला राजीनामा
“दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ”
‘प्रसंगी रक्त सांडवू पण…’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गंभीर इशारा
Comments are closed.