“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या शिवाजी पार्कात”
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर मलिक हे केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात त्यामुळे कारवाई केली जात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर थेट ईडीलाच आव्हान केलं आहे.
ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या, असं आव्हान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही 170 जणं एकत्र भेटू. कदाचित तुमचं काम संपेपर्यंत 170 चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असा दावा करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेलेत तर काही सुपात आहेत. उत्तर प्रदेशात 7 मार्चला शेवटचं मतदान झालं की, कारवाई सुरू होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यातच यशोमती ठाकूर यांनी 170 चा आकडा आणखी बदललेला असू शकतो, असं म्हटलं आहे.
दरम्यान, आज भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई सुरू केली होती. नवाब मलिक यांच्या एकूण चार मालमत्तांची चौकशी करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या कुटुबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. ईडीकडून नवाब मलिक यांची सलग 8 तास चौकशी करण्यात आली.
थोडक्यात बातम्या-
Nawab Malik Arrested | “ही कायदेशीर आणि राजकीय लढाई आम्ही लढू”
अटकेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले “मला जबरदस्तीने…”
दहावी बारावीच्या परिक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
“मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा…”
“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी”
Comments are closed.